अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ५
पुढे......
नगर व्यवस्था लावून महाराणीचा लवाजमा पुढील प्रवासास मार्गस्थ झाला. प्रधान पत्नी थोड्याशा दुःख सागरातून सवरल्या होत्या. त्यांनाही हितगुज साधत महाराणीची स्वारी पुढे निघाली. वाटेतील अनेक ग्रामाच्या व्यवस्था लावून त्यांची स्वारी राजधानीच्या दिशेने निघाली. पुढे राज्यमार्ग लागला. जो राजधानीकडे जात होता. प्रत्येक गावातील रयतेच्या समस्या ऐकत त्याचे निराकरण करत त्या निघाल्या होत्या. राजधानी मार्गावरील प्रत्येक गावांना भेटी देत रथ शेवटी राजधानीत आला. राजधानीतून जाताना पेठ लागे. तेथील विशाल प्रासाद व भव्य राजवाडे तसेच इतर ठिकाणे मन आकर्षित करणारे ते वैभव होते. दोन्ही बाजूस असणारी पेठेतील विविध दुकाने तसेच तेथील लोकांची घरे मन आकर्षित करत होती. व्यापारी येणाऱ्या गिर्हाईकांना मालाची देवघेव करत होते. ती विविध वस्त्रे आभूषणे , धान्य व कलाकुसरीच्या वस्तूंनी, विविध गृहपयोगी वस्तू, सौंदर्य प्रसाधने असणारी दुकाने पाहून मन प्रसन्न होत होते. वेगवेगळी हातमागावर विणलेली वस्त्रे तर खूपच छान दिसत होती. अशा या पेठेतून महाराणीची स्वारी राजवाड्याच्या दिशेने निघते. वाटेत असणाऱ्या प्रधनांच्या वाड्यासमोर रथ थांबतो. त्यातून प्रधान पत्नी व दोन दासी उतरल्या. व प्रधान पत्नी आपल्या महालात जड अंतःकरणाने गेल्या. महाराणीचा रथ पुढे मार्गस्थ होतो.
प्रधान पत्नी आत महालात आल्यानंतर त्याना आपल्या लहान मुलाची आठवण होते व त्या पुन्हा शोक करू लागल्या. इतक्यात त्यांच्या दालनात प्रधान वेददत्त आले. ते आल्याचे दासीने श्यामलतांना सांगितले. वेद्दत्त शामलते जवळ येऊन बसले. त्याना पाहून श्यामलता पुन्हा रडू लागल्या. प्रधान पण रडू येत होते. पण त्यांनी शोक आवरला. व आपल्या खास अंग्रक्षकास बोलण्यास सांगितले. अंगरक्षकास दासी बोलावून घेऊन आली. अंगरक्षक विभुव आत दालनात आला. त्याला पाहून प्रधान वेददत्त म्हणाले, “ विभुव तुम्ही महाराणीच्या सेनेतील एक स्वार घ्या व आपले शस्त्रधारी शीलेदर घेऊन सदर ठिकाणी जाऊन पुन्हा तपास करा व आमचे चिरंजीवांचा शोध घ्या.”
वीभुव, “ जी, मी लगेच निघतो.”
विभुव् लगेच निघाला.
प्रधानपत्नी श्यामलता प्रधानांच्या छातीवर हुंदके देत रडू लागल्या. दासी त्यांनां सावरू लागली. पण त्यांना खूप रडू येत होते. प्रधानमंत्री त्याना आपल्या काळजावर दगड ठेवून समजावू लागले.
“ श्यामलते असा शोक करणे बरे नव्हे आपण एक विरपत्नी आहात.”
श्यामलता, “ नाथ ही आपल्यावर किती दुष्ट वेळ आली. ज्या परमेश्वराने सुंदर फुल दिले ते त्यानेच असे का दूर केले. ती वाघीण, कोण्या जन्मीचा बदला घेण्यास आली. तिच्या ताब्यात आपले कोवळे बालक रत्नाकर कसे सापडले.”
त्या रडू लागल्या. प्रधानमंत्री त्याना समजावून सांगू लागले. थोडा वेळ थांबून पुन्हा राज्य दरबारी कामकाज असलेने ते आपल्या पत्नीचा निरोप घेऊन निघून गेले. श्यामलता शोक करत राहिली. दासी त्यांना सावरत होती. थोड्या वेळाने त्या झोपी गेल्या.
…………. …… …… …..
प्रधान पत्नीना सोडून महाराणीचा रथ हा राजवाड्याच्या दिशेने मार्गस्थ होतो. थोड्याच वेळाने महाराणीचे राजमहालात आगमन झाले. राणीनी दासीला स्नानगृहात पाणी काढण्यास सांगितले. त्या तेथे गेल्या. त्यांनी स्नान केले. तदनंतर त्यांनी दासीला विश्रांती घेणार असल्याचे सांगितले. अल्प फलाहार करून त्यांनी एकांत स्वीकारला. व त्या विश्रांती घेण्यासाठी शयनगृहात गेल्या. थोड्या वेळाने महाराज जयवर्धन यांचा नगर प्रदक्षिनेसेस गेलेला रथ राजमहालात दाखल झाला. राजमहालात आल्यावर महाराणी आल्याचे समजताच त्यांनी दासीला निरोप पाठवून चौकशी केली. तेव्हा महाराणी विश्रांती घेत आहेत हे त्यांना समजले. काही घटिके नंतर महाराणीना जाग आली. त्या दासी दुस्यलेस हाक मारतात. दासी हजर होते. तीने त्यानां महाराज आल्याचे सांगतले. महाराणी आपले आवरले. त्यांनी महाराजांना अंतपुरात बोलवून आणण्यास दासीला सांगीतले. दासी दुस्यलाने जाऊन महाराजांना बोलावून आणले. महाराज आले नंतर अंतपुरात महाराणी व महाराज यांमध्ये प्रवासात घडलेल्या घडामोडी व राज्यातील इतर घडमोडी यावर एकांतात चर्चा होते. प्रधान पुत्राचे वाईट झाल्याने राजा राणी दुःखी होतात. व ते त्यांचे महाली जाऊन सांत्वन करुन आले .महाराज जयवर्धन आपल्या राज्याची व्यवस्था लावून राज्यपाठ सांभाळत होते. एके दिवशी राज्य दरबार भरलेला होता. राज्याचा कारभार व इतर घडामोडींवर राजा, प्रधान व मंत्री चर्चा करत होते. इतक्यात एक द्वारपाल आत मध्ये दरबारात आला.
द्वारपाल, “ महाराजांचा जयजयकार असो. पूर्व उत्तरप्रांताचे विभाग नगरनायक आपणास भेटू इच्छितात. व त्यासाठी आपली अनुमती मांगत आहेत.”
महाराज, “ अनुमती आहे.”
सेवक निघून गेला. थोड्याच वेळात तो व त्या पाठोपाठ पूर्व विभागाचा नगरनायक आत महालात दाखल झाला.
पूर्व प्रांतनायक अनंग, “ महाराजाचा जयजयकार असो. महाराज मी उत्तर पूर्व विभागाचा नायक आहे. आपला हा भाग अश्मक खोऱ्यास लागून आहे. नेहमी परचक्र व अवर्षन या समस्यांना आम्हाला तोंड द्यावे लागते. तरी या वर्षी पर्जन्य कमी झाले. वरूणी देवाच्या अवकृपेमुळे रयतेचे जगणे दुस्वर झाले आहे. तरी अन्नधान्य तुटवडा मोठ्या प्रमाणात झाल्याने रयत परागंदा होण्याच्या मार्गी आहे. तरी आपण यासाठी काही मदत करावी. जेणे हा प्रांत उजाड व भकास होणार नाही. रयत आस लावून बसली आहे.”
महाराज जयवर्धन, “आपली व्यथा आम्हास गुप्त हेरांनी तसेच आपण पाठवलेल्या दुताकरवी समजली. तेव्हा आपल्या राज्यासाठी आम्ही राज्य अंबारातून काही धान्य देत आहोत. तसेच आपल्या भागात जिथे शक्य असेल तिथे तलाव विहिरी खुदाई करणेस राजदरबारतून योग्य निधी पाठवला आहे. तो दोन तीन दिवसात सर्व पोहोचेल. तसेच त्या विभागातील नगर सूरक्षेसाठी आम्ही वास्तू विशारद पाठवत आहोत. त्यांची व्यवस्था तुम्ही करावी. ते नगर सुरक्षेसाठी योग्य रचना करतील. ती आपण बांधून घ्यावी. यासाठी आम्ही तुम्हाला निधीसाठी राजपत्र देत आहोत. तसेच सीमा सुरक्षेसाठी गस्त वाढवावी तसेच योग्य खबरदारी घ्यावी.”
महाराज लेखानिकास आदेश देतात. लेखनिक पत्र तयार करतो. ते पत्र महाराजांनी पूर्व नगर नायक अनंग यास दिले. तो ते घेऊन द्रव्य निधी असणाऱ्या खजानिसाकडे महाराजाची अनुमती घेऊन निघून गेला.
क्रमशः पुढे………

No comments:
Post a Comment
This is not government websites only private , here deta is a calect to gather our saround see and hearing deta so you check to government websites and agree whit it.