Showing posts with label अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग १४. Show all posts
Showing posts with label अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग १४. Show all posts

Saturday, February 4, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथाभाग १४

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग १४



क्रमशः पुढे चालू.......

त्रिशलेकडून रोज नवीन नगरातील गमती ऐकूण अंबालेला देखील आपणही मुक्तपणे नगरात फिरावे असे वाटू लागले होते. तिला राजकुमारी असल्याने सहसा एकटे जायला मुभा नव्हती. त्यासाठी वेशांतर करून जावे असे तिला वाटत होते. त्यासाठी पेहराव हवा होता. यासाठी तिने त्रिशलेस पेहराव आणण्यासाठी तिने दोन मोहोरा दिल्या.

संध्याकाळी त्रिशला आपल्या मातेस भेटण्यासाठी प्रधान महाली निघाली. जाताना ती मोहोरा घेऊन गेली. त्या रात्री तिथे आपल्या मातेसवे तिने घालवला. सकाळी प्रभात समई ती लवकर उठली. व तिने आपले आटोपले. साजशृंगार करून ती मातेचा निरोप घेऊन निघाली. राजवाड्याकडे जाताना एक सेवक तिच्या सोबत लावून देण्यात आला. अर्धा रस्ता पार केल्यावर तिने त्या सेवकास माघारी निघून जाण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, की तो तिला राजवड्यापर्यंत सोडेल. तेव्हा ती म्हणाली, “ मी राजकुमारी अंबलाची सखी आहे. तेव्हा मी माझे रक्षण करू शकते. तेव्हा तुम्ही इथून मागे गेलात तर बरे होईल.”

तेंव्हा तो सेवक दचकला. व म्हणाला, “ मला तुम्हाला महालापर्यंत सोडण्यास सांगितले आहे.”

शेवटी राजवाड्यापाशी आल्यावर तिने त्या शिपायास परत पाठवले. तो मागे वळून थोड अंतर जाताच ती तिथून निसटली. व एका छोट्या गल्लीत घुसली. त्या शिपायाने मागे पाहिले ती दिसली नाही त्यास वाटले ती राजवाड्यात गेली असेल. पण त्रिशला थेट पेठेतील चिंचोळ्या वाटेने पुढे सरकली. ती थेट पुजारी गल्लीत गेली. तेथून पुढे होऊन महादेव मंदिरा जवळून व्यापारी पेठेत गेली. तिथे प्रवेश केल्यावर तेथील प्रत्येक व्यापारी देवडी न्याहाळत ती पुढे निघाली. पेठेत वेगवेगळ्या धान्यांच्या, तसेच कपडे, दागिने, भांडी, मिठाईच्या देवड्या होत्या. तेथून पुढे गेल्यावर मडक्याच्या उतरंडीची कुंभाराची देवडी लागली. तेथून ती थेट पुढे गेली. तिथे अनेक वाणी ओरडुन लोकांना आकर्षित करत होते. तिने पेठेतील एका कोपऱ्यात कपड्याच्या ओसरीची देवडी हेरली. व ती तेथे गेली. त्या ठिकाणी कपडे न्याहाळत तिने त्यातील तीन पुरषी पेहराव शोधून काढले. त्याचे मूल्य तिने त्या विक्रेत्या विचारले. तेव्हा त्याने पंधरा तांब्याचे सिक्के सांगितले. थोडे वर खाली दर विचारणे झाल्यावर तिने ते सहा सिक्याला ठरवले. व मूल्य भागवणेसाठी तिने एक मोहोर त्यापुढे सादर केली. पण त्या मोहरेकडे आश्चर्य मुद्रेने पहात तो म्हणाला, “एवढं सुट्टे मजकडे नाहीत. व अजून आजचा शुभारंभ देखील झाला नाही.”

त्रिशला, “ पाहा दुसरीकडून कोठून मिळते का?”

विक्रेता, “ एवढे सुट्टे कोण देणार या प्रभाती. प्रत्येकास लागतात. व कुठे सापडली ही मोहोर. की चोरी….”

तो बोलायचे थांबला. तसे त्याचे म्हणणे लक्षात येताच ती रागीट नजरेने त्याकडे पहात

“ तुला मी कोणी चोर की भिकारी वाटलो का? मी राजकुमारी अंबालाची स्नेही आहे. त्यामुळे राजवाड्यात वावरताना अशा अनेक मोहरा मी नेहमी इथे तिथे पहाते.”

विक्रेता, “ एवढ्या मोहरा पाहिल्यावर कोणीही लोभी होऊ शकतो.”

त्रिशला, “ अरे वस्त्र वाण्या तू तुझी मर्यादा सोडून बोलतोस. माझ्या मनात आले तर तुझे पेठेतील व्यापारी स्थान मी हिरावून घेऊ शकते.”

तिचे विस्फारलेल्या नेत्र पाहून अन् करडा आवाज ऐकून त्या वाण्याने पटकन ती वस्त्रं एक कापडात बांधली. व तिच्याकडे दिली. तिने मूल्य घे म्हणताच तो म्हणाला , की आपण मला नंतर दीले तरी चालेल. व त्याने ती मोहर न घेता कपडे देवून टाकली.

ती वस्त्र घेऊन ती रजवड्याकडे निघाली. जाताना तिच्याकडे पहारेकरी नी चूकही केली. त्या कापडात काय आहे. तेव्हा ती म्हणाली, की त्यात तिची काही कपडे आहेत. तिचा रोजचा वावर लक्षात घेता पहारेकर्यानी तिला आत सोडले. ती थेट राजकुमारीच्या कक्षात गेली. राजकुमारी अंबाला तिची वाट पाहत आपल्या दालनात बसली होती.त्रिशलेला येताना पाहून राजकुमारीने आपल्या दालनातील दासींना बाहेर जाण्यास सांगितले. त्रिशलेने आल्यावर आपण आणलेली ती वस्त्रे राजकुमारीजवळ सादर केली. ती कपडे पाहून अंबाला खुश झाली.

पण तिच्या मनात अनेक प्रश्न पडले. व ती नाराज झाली. तिचा उदास चेहरा पाहून

त्रिशला, “ काय झालं अशी उदास का? तुला हवी तशी वस्त्रे तर मिळाली आहेत.”

अंबाला, “ वस्त्रे मिळून काय उपयोग. हा कडकं पहारा आहे ना. तो कसा भेदायचा.”

यावर त्या विचार करू लागल्या. पण त्यांचा हा प्रश्न सुटता सुटेना. त्या दिवसभर याच गोष्टीचा विचार करत होत्या. संध्याकाळी प्रधानांच्या महाली जाताना मोहोरा परत देवून त्रिशला काही ताम्र सिक्के घेऊन गेली. व तिने त्या विक्रेत्याची उधारी भागवली. व ती आपल्या मातेस भेटण्यास प्रधान महाली गेली.

खूप दिवस जातात पण त्यांना त्या प्रासादाबाहेर जनेचा एकही मार्ग धड नाही मिळत कारण सर्वत्र कडक पहारा होता. तेथून कसे बाहेर पडावे हे तिला कळत नव्हते. एके दिवशी त्रिशला राजवाड्यातून फिरत असताना ती महाराणी अरूणावतीच्या एका पट्टदासीला एका दालनात जाताना पाहिले. तिने तिकडे जाताना तिला अडवले गेले. व तिकडे जानेस मनाई केली. ती खोली बंद असे. तिथे कडक पहारा असे. तिथे जाण्यासाठी राजकुमारीच्या दालनातून शेजारी असणाऱ्या सभागृहातील शेजारी असणाऱ्या गवाक्षामधून जाता येत असे. त्रिशलेन विचार केला. राज्य खजिना खोली दुसरीकडे असताना येथे कडक पहारा का बरं ठेवला असेल. याचा विचार करत ती राजकुमारीच्या दालनात गेली तिने राजकुमारीला बोलली, की एवढा कडक पहारा तिथे का आहे. तेव्हा राजकुमारी देखील म्हणाली , की तिला ही आजपर्यंत तिथे जाऊ दिले गेले नाही.

राजकुमारीने ठरवले की आपण स्वतः त्या दालनाचे रहस्य शोधायचे. व ती त्या कामास लागली. त्या दिवशी त्रिशला तिथे वस्तीला राहिली. रात्र झाली अकरावा प्रहर झाला. राजकुमारी अंबाला व त्रिशला हळूच उठल्या. त्यांनी झोपायच्या जागेवर लोड ठेवून ते झाकून टाकले. तेथून त्या स्नानगृहात आल्या. तेथील गवाक्षाची जाळी त्यांनी काढण्यास सुरुवात केली. ती हळूहळू धारदार कैचीने त्यांनी कापली. जी राजकुमारीनी शस्त्रागारातून आणली होती. ती जाळीला चिरून त्या गवाक्षातून त्या आतील दालनात आल्या तिथे खूप अंधार होता. त्या संपूर्ण अंधाऱ्या खोलीत आल्यावर राजकुमारीने दिवटी पेटवली. जी तिने आपल्या कक्षातून आणली होती. दिवटीच्या उजेडात त्या निरीक्षण करू लागल्या. ती खोली इतर खोली सारखीच होती. पण तिथे काहीतरी अगम्य आहे असे वाटत होते. त्या दृष्टीने त्या तेथील प्रत्येक वस्तू व भिंत न्याहाळत होत्या. शेवटी सर्व शोधून झाल्यावर व काही विशेष नाही म्हंटल्यावर त्रिश्रला अंबालेला म्हणाली,

“ मला काय इथे काही विशेष वाटत नाही.”

अंबाला इकडे तिकडे पाहत म्हणाली, “ नाही कसे, मला तर हा दरवाजा विशेष वाटतो.”

ती त्या दरवाजाकडे गेली. व आपल्या हातातील दिवटी अंबालेने त्रिशलाकडे दिली. व ती त्या प्रकाशात कपाट न्याहाळू लागली. त्यास ना कडी ना कोयंडा त्यांना आजुबाजूस काहीच निशाणी आढळत नव्हती. त्यांनी खूप प्रयत्न केला. पण ते दार काही उगडेना. शेवटी हताश होऊन त्या मागे फिरताना अचानक त्रिशलेचा हात शेजारील खुंटिस लागला. व ती फिरली. तसे दार सरकले. अंबालेने दाराचा आवाज ऐकून मागे पाहिले. तिला ते किंचित सरकले दिसले.तिने त्रिशलेस खुंटी फिरवण्यात सांगितली. तिने ती फिरवताच दार सरकले. अंबाला पुढे झाली तिने बारकाईने निरीक्षण केले. ते एक कपाट आहे असे वाटत होते. त्याच्या आतील बाजूस दोन मासे एकमेकास शिवत आहेत अशी नक्षी असणारे एक धातूचे शिल्प दिसले. तिने डोळे लावून आतील कपाटाच्या लाकडी दारास पाहिले. व अंदाज घेऊ लागली. तेव्हा तिला हवेच्या झोताची झुळूक जाणवली. तिने ती मासोळी फिरवून पहिली. अन् एकदम ते कपाटाच्या आतील दार सरकले. व तिथे पायऱ्यांची वाट दिसली. त्या दोघी दीवटीच्या उजेडात हळूहळू त्या पायऱ्यांच्या वाटेने पुढे निघाल्या. थोडेसे पुढे गेल्यावर दोन मार्ग लागले. त्यातील एका मार्गाने त्या पुढे निघाल्या. त्यानंतर काही अंतर चालल्यावर तिथे पाणी लागले.

अंबाला, “ त्रिशले येथून पुढे पाण्याचा भाग आहे. त्याकरणे पुढे जाणे धोका निर्माण करणारे आहे. परत कधीतरी पाहू.”

त्रिशला, “ मग आपण त्या दुसऱ्या मार्गाने जाऊया का?”

अंबाला, “ आता नको परत कधीतरी जाऊ, अन्यथा आपल्या या योजनेचा सुगावा लागेल.

क्रमशः पुढे.......


अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...