अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा
भाग ४
नगर दरवाजा उघडण्यास विलंब लागला म्हणून महाराणी क्रोधित झाल्या होत्या. परंतु सीमावर्ती नगर असलेने त्या बाबत त्या काही बोलल्या नाहीत. राग आवरता घेऊन त्यांनी सारथ्यास आपला रथ अतिथी गृहकडे न्यायला लावला. नगरीतील त्यांनी अतिथी महलाकडे प्रस्थान केले. नगरीच्या मुख्य पेठेतून रथ पुढे देवी भगवती देवीच्या मंदिरा जवळून निघाला. तेव्हा महाराणीनी सारथ्यास रथ थांबवण्यास सांगितला. त्यांनी बाहेरूनच दर्शन घेतले. कारण प्रधान पत्नीच्या मुलाबाबत जे घडले. त्या दुःखातून त्या सावरलेल्या नव्हत्या. तेव्हा त्यांनी रथ पुढे नेला. प्रधान पत्नी अश्रू ढाळताना त्यांना दिसल्या. तेव्हा महाराणी म्हणाल्या, “ आपण प्रधान पत्नी आहात. असा शोक करणे बरे नव्हे. घडलेली घटना ही वाईटच होती. पण काय करणार आपण. विधिलिखित कोणी बदललेले आहे का? तेव्हा आपण सावरावे. व देवीमातेकडे मागणं मागा तुमचा पुत्र जिथे कुठे असेल तिथे सुरक्षित राहू दे.”
प्रधान पत्नीनी बाहेरून हात जोडले व डोळे बंदकरून मागने मागितले. थोड्या वेळात महारणीचा काफिला नगराच्या अतिथी महालात आला. नगराच्या मध्यभागी असणारा तो महाल चारी बाजूंनी उंच अशा भिंतींनी बंदिस्त होता. त्याचा मुख्य दरवाजा उत्तरेस होता. पेठेच्या मध्यवर्ती असलेने तो महाल मुख्य रस्त्यावरून सुरेख दिसत होता. त्यामध्ये अनेक लहान मोठी विशाल दालने होती. ती राजेशाही लोकांसाठी असलेने त्याची निगराणी चांगली होती. तेथे एक मध्यभागी विहीर होती. ती संपूर्ण उन्हाळ्यात सुद्धा भरलेली असायची. ती संपूर्ण तेथील पाण्याची गरज भागवत होती. त्यामुळे तो स्वयंपूर्ण वाडा भासत होता. महालाच्या मुख्य दरवाजाशी अश्वरथ उभा राहिला. महाराणी रथातून उतरल्या. पाठोपाठ प्रधान पत्नी ही खाली उतरल्या. व त्यांनी आपल्या काफिल्यासह आत प्रवेश केला. महाराणी येण्यापूर्वी. तेथील सेवकांनी सर्व व्यवस्था लावली होती. प्रवासाने थकलेले सैनिकांना विश्रांती घेण्यासाठी महाराणीनी सांगितले त्ले व महाराणी अरूणावतीनी आपल्या स्नानाची व्यवस्था दासी दुश्यलेस करायला सांगितले. तेव्हा दासी दुश्यला महाराणींची स्नान व्यवस्था लावण्यासाठी गेली. तिने सेवकाकरवी महालाच्या त्या मध्य भागातील विहिरीतून पाणी काढले. व स्नान गृहातील रांजनाखाली जाळ घातला. त्यामधे सुगंधी द्रव्ये घातली. व तिने थोड्या कालावधीत पाणी तापवून इस्वान करण्यासाठीं कुंडात काढले. तसेच प्रधान पत्नीच्या दालना शेजारील स्नान गृहात एका दासीला त्यांनी प्रधानपत्नीसाठी स्नान तयारी करण्यास सांगितले. व दुश्यला महाराणीच्या दालनात आली. दुश्यलेस पाहून
अरूणावतीं महाराणी, “ दासी दूश्यला, यावेळी तुम्ही जातीन प्रधानपत्नीकडे पाहा. कारण त्यांना पुत्र शोक झाला आहे. व त्यांना सांत्वन करण्याची जास्त गरज आहे. तरी तुम्ही आम्हास सोडून प्रधानपत्नीकडे पहावे. व दुसर्या दासीला आमच्या सेवेस पाठवावी.”
दुश्यला, “ महाराणी मी प्रधानपत्नीची व्यवस्था नीट लावली आहे. तिकडील चिंता नसावी. मी पुढील प्रस्थानाची व्यवस्थापन व येथील व्यवस्था लावण्यास मुख्य नायकाशी चर्चा करण्यास जाणार आहे. तरी आपल्या सेवेस दुसऱ्या दासीला पाठवते.”
असे सांगून ती निघून गेली. व तिने दुसऱ्या दासीला राणीकडे पाठवले. दुसरी दासी थोड्याच वेळात हजर झाली.
सुचित्रा दासी, “ महाराणीचा विजय असो. दासी सुचित्रा आपल्या सेवेत हजर आहे. व बाहेर एक सेवक अल्ल आहे. व आपणास भेटू इच्छितो.”
महाराणी, “ त्यास आत बोलवं.”
दासी बाहेर गेली व सेवकास बोलावून घेऊन आली.”
सेवक, “ महाराणींचा जय असो. आपल्या सांगण्या नुसार मी आपला निरोप नगरपट्ट नायक सुरेंद्र याकडे पोहोचवला असून ते थोड्याच वेळात आपल्या समोर हजर राहतील. त्या अबला स्त्रीस बाहेरील ओसरीत जागा दिली असून त्या दोन उन्मत्त जवान तरुणांना कारागृहात पाठवले आहे.”
महाराणी, “ ठीक आहे, जेव्हा नगरनायक हजर राहतील तेव्हा आम्हाला कळवण्यास या.”
महाराणीची आज्ञा ऐकूण तो सेवक गेला. महाराणीनी आपले स्नान आटोपले. व आपला साजश्रृंगार करून त्या पुन्हा आपल्या दालनात आल्या. दासी त्यांच्या सेवेत होती.
थोड्या वेळात नगर नायक आले. त्यांनी महाराणींच्या दर्शनासाठी आज्ञा मागितली.
दासी आत गेली. व महाराणीचा निरोप घेऊन आली. व त्यांना बाहेरील मुख्य दालनात बसावयास सांगितले. थोड्याच वेळात आरूणावतीं तेथे आल्या. आसनावर बसल्या.
नगर नायकास पाहून
महाराणी अरुणावती, “ सेवक त्या अत्याचार झालेल्या महिलेस व त्या दोन तरुणांना सादर करा.”
थोड्याच वेळात त्या स्त्रीस व त्या दोन तरुणांना हजर केले गेले. महाराणीचे काही अंगरक्षक देखील तिथे होते. महाराणीनी सर्व शहानिशा केली. व त्या युवकांचे एक एक हात कलम करण्याचा आदेश दिला. व त्या स्त्रीस त्यांच्या भावाकडे पाठवायचे ठरवले.”
सेवक त्या दोघांना घेऊन गेले. महाराणीनी आपला मोर्चा नगर नायकाकडे वळवला. त्यांना उद्देशून महाराणी बोलली, “ नगर नायक महाराज जयवर्धन यांच्या राज्य सीमेवरील नगरातील सावळा गोंधळ आम्हास दिसला. अशाने परचक्र राज्यावर चालून यायचे. आपलं मत काय याबाबत सविस्तर तपशील द्यावा. तसेच नगर दरवाजा पासून सीमेवरील सैन्य व्यवथा कडक जरी असली तरी म्हणावा तितका बंदोबस्त नाही. तसेच नगरात येता दिसलेली अस्वच्छता ही आपल्या कार्याची पोहोचच दिसते.की आपले किती लक्ष नगराकडे आहे ते. दक्षिनापथ क्षेत्रातील लागून असलेल्या राज्यात. परराज्यातून आलेल्या परचक्रात भरडलेल्या लोकांवर अन्याय होतो तरीदेखील तुमचे लक्ष नाही. हे योग्य नव्हे.”
महाराणीचे बोलणे ऐकून नगर नायक म्हणाला, “महरणीना प्रथम माझा नमस्कार, नगरातील अस्वच्छतेबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो.. कारण काल नगर पेठेचा वार असल्याने परिसर अस्वच्छ होता. तो आज स्वच्छ होईल. नगरातील सैन्य व्यवस्थेत सैन्याची कमतरता आहे. याबाबत अधिक माहिती विभाग प्रमुखांना दिली होती. आपण आम्हास सैन्य भरतीचे अधिकार द्यावेत. “महाराणी अरूणावती, “ नगर अस्वच्छतेसाठी आपण दिलेले कारण योग्य नाही. कारण ती अस्वच्छता ही काही एका दिवसाने झाली नाही. रस्त्याच्या दुतर्फा असणारे सांडपाणी पाहता या सुंदर नगरीस आपण विकृत केले. व आम्हास नको ते कारण सांगता. व राहता राहिला सुरक्षेचा प्रश्न, तर उद्या दवंडी द्यावी आम्ही जातीनिशी नव युवकांची नेमणूक करतो. पर राज्यातून येणाऱ्या लोकांची सखोल चौकशी करून त्यांना कुंतल प्रदेशातील दख्खन भागात स्थिर करावे. ताकी त्यांना आपल्या राज्यात मानाने राहता येईल. यासाठी नगर दंड अधिकारी यांचे पूर्ण चौकशीचे राजपत्र देणेत यावे. व त्यांना कुंतल प्रदेशात पाठवावे.”
नगर नायक शांतपणे सर्व एकत होते.
थोड्याच वेळात एक सेवक तिथे आला. महाराणीना वंदन करून म्हणाला, “ महाराणीचा जयजयकार असो दोन पारधी युवक आपणास भेटू इच्छितात.”
महाराणी, “ त्यांची संपूर्ण तपासणी करून आत आणावे.”
सेवक बाहेर गेला. व त्या दोन पारधी पुरुषांची संपूर्ण चाचपणी करून त्यांना आत घेऊन आला.
दोन युवक पुरुष आत आले. काळ्याशार रंगाचे ज्यांनी कमरेला एक त्रिकोनाकृती रुमाल घातले होते. व ज्यांनी डोक्याला एक रुमाल बांधला होता. त्यामध्ये पक्षांची पिसे खोवली होती. अंगावर वेगवेगळ्या मण्यांच्या माळा त्यांनी धारण केल्या होत्या. ते सेवकांसवे आत आले. त्यांनी महाराणींना लवून मुजरा केला. व ते बोलण्याची अनुमती मागू लागले. महाराणीनी अनुमती दिली.
पारधी, “ महाराणींचा विजय असो. आम्ही दोघे बंधू त्या अत्याचारित महिलेचे बंधू आहोत. आम्ही अश्मक खोऱ्यातील दख्खन देवी गोदावरी तीरी राहणाऱ्या एका ग्रामाचे रहिवासी असून आमच्या राज्यात आलेल्या परचक्रामुळे परागंदा होऊन इथे आलो आहोत. तरी आम्हाला इथे राहण्याची परवानगी राजा जयवर्धने यांचें परवानगीने मिळाली असून देखील इथिल काही अधिकारी आम्हास त्रास देतात. त्या कारणे आमची बरीच कुटुंबे नगराबाहेर अरण्यात राहतात. दोन दिवसांपूर्वी आलेल्या चक्रवाताने आमची कुटुंबे विखुरली गेली. तरी आमच्यावर दया दाखवू. राहण्याची सुविधा द्यावी.”
महाराणी अरुणावती, “ आपणास आम्ही आमच्या राज्यात राहण्याची अनुमती देतो पणं आपण व आपली कुटुंबे यांनी राजदंडाधिकरी यांकडून राजमोहर प्राप्त पत्र घ्यावे. व कुंतल प्रदेशाच्या दक्षिण भागात आपणास राहण्याची अनुमती दिली जाईल. त्या प्रदेशात आमच्या राज्याची जनसंख्या कमी असलेने आपण त्या प्रदेशात वस्ती करावी.”
महाराणी दासीस बोलावतात. त्या स्त्रीस वस्त्रे व तीन सुवर्ण मोहोरा देवून तिच्या भावांच्या हवाली करणेस सांगीतले. पारध्यांनी महाराणींचा जयजयकार केला. व त्याप्रमाणे ते दासीच्या मागे गेले.
महाराणी नगरनायकास,
“ नगर पट्टनायक आम्ही सांगितलेले प्रश्न त्वरित सोडवावेत अन्यथा आपले पद बरखास्त करण्यात येईल. आपण आमचे नाते संबंधातले म्हणून कोणतीही गय केली जाणार नाही.”
नगर नायक तेथून क्षमा मागून निघून गेले. जाताना आपल्या आज्ञेनुसार सर्व होईल. याची हमी देतात.”
नगर नायक निघून गेल्यावर दासीला मुख्य सेवकास बोलविण्यास सांगितले. त्याला नगरदंडनायकास बोलविण्यास पाठवले. तसेच नगरातील मुख्य लोकांना ही निरोप देण्यास लावले. व त्वरित त्यांना बोलावले. राणीआज्ञा ऐकूण ते अधिकारी त्वरित हजर झाले. महाराणी अरूणावतीनी बैठक भरवली. बैठकीत
महाराणी नगरदंडाधिकाऱ्यांना म्हणाली, “ नगरदंडाधिकरी आपणास नगराच्या सुव्यवस्थेची व कायद्याची जबाबदारी दिली आहे. तसेच नगरनायकावर नजर ठेवणेस सांगितले असता या नगरीची अशी अवस्था कशी आपण होऊ दिलीत यासारखे दुर्दैव नाही. आता पर्यंत झाले ते झाले. इथून पुढे आपण काटेकोर पाहणी करून कामाचा लेखाजोखा थेट राजदरबारी पाठवणे. तो आम्ही पहात जाऊ. तसेच इथून पुढे अश्मक खोऱ्यातून येणाऱ्या लोकांना त्यांची योग्य चौकशी करून त्यांना कुंतल प्रदेशात पाठवण्याची व्यवस्था तुम्ही करणे. तसेच नगर पेठेचा कारभार सूरजमल पेठनायक करेल. त्यांनी सर्व स्वच्छता व कारभार पाहणे. व नगरदंडनायकानी त्याचा लेखाजोखा तपासणे. व कारागृह रक्षकांना नवीन शंभर नवयुवक सैन्य भरतीसाठी परवानगी देत आहोत. तसेच नगर सुरक्षेसाठी जिथे तट उभारता येईल तिथे उभा करा. त्यासाठी आम्ही एक सहाय्यक प्रतिनिधी पाठवू तसेच निधी देखील पाठवला जाईल. व हे त्वरित करणेत यावे.”
इतके बोलून महाराणीनी राजमोहोर अधिकृत लिखितपत्र त्यांना देवून त्यांवर जबाबदारी सोपवली. नंतर गुप्तहेरांची बैठक घेऊन त्या नगराची व्यवस्था त्यांनी लावली. दोन दिवसात सर्व कामे मार्गी लावून महाराणीनी दोन दिवस काही सैन्याकरवी प्रधान पुत्राचा काही सुगावा लागतो का ते पाहिले. पण काही क्षेम कुशल कळले नाही.
प्रधानपत्नी या पुन्हा शोक करू लागल्या. महाराणीनी पुन्हा समजूत घातली. महाराणीनी पुढे राजधानीकडे प्रस्थान करण्याचे ठरविले. व त्यांनी तसे आदेश सैन्य नायकास दिले. व प्रस्थानाची तयारी झाली.
क्रमशः पुढे...

No comments:
Post a Comment
This is not government websites only private , here deta is a calect to gather our saround see and hearing deta so you check to government websites and agree whit it.