Showing posts with label अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग १२. Show all posts
Showing posts with label अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग १२. Show all posts

Thursday, February 2, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथाभाग १२

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग १२

क्रमशः पुढे चालू....



आपल्या पित्याच्या कमरेला मळलेला तो चार पदरी गोप त्याने कापला. व एक चांगला वेत निवडून त्यापासून सुंदर धनु बनवला. तो गोप बांधून त्याची प्रत्यंचा त्याने केली त्याच बरोबर त्याने त्या वेताचे शर तयार केले. व ते बरेच स्त्री शर होते. जे अचूक वेध घेत. जे त्याने त्याच्या पित्यास तयार करताना पाहिले होते. काही छनातच त्याने ते बनवले. शराच्या मुखात त्याने चिर करून त्या थैलितील हिरवट औषधी घातली. जी एखाद्या प्राण्यास बेशुद्ध करू शकत होती.

त्यानंतर आपल्या अंगावरील अंगरखा काढला. जो फाटला होता. त्याची भात्यासारखी रचना करून पाठीशी बांधली. व त्यात शर ठेवले. आता सूर्य अस्ताला जाऊन चांगलाच अंधार पडला होता. नंतर त्याने आपल्या पित्याचे शरीर जवळ असणाऱ्या विशाल झाडाखाली जाळीजवळ आणले. भिल्लमाचे शरीर खूप भभारीरी असल्याने त्यास ते ओढता ओढेना. तरी त्याने अथक प्रयत्नाने ते ओढत आणले. व झाडाच्या काही डहाळ्या त्याने मोडल्या व त्याने आपल्या पित्यास झाकून टाकले. ते धारदार शस्त्र एका वेलीच्या साहाय्याने आपल्या कमरे भोवती बांधले. व तो झाडावर चढला. आता सुर्य अस्ताला जाऊन बराच वेळ होऊन गेला होता. चांगलाच अंधार पडला होता. रातकिड्यांची किरकिर सुरू झाली होती. अधून मधून काजवे झाडीत चमकू लागले होते. अमावस्या संपली असल्याने चंद्रकोरीचा प्रकाश पुरत नव्हता. चंद्र फक्त आकाशात रात्रीचा साथीदार म्हणून अस्तित्वात होता. रात्र चांगलीच गडद झाली होती. व त्या परिसरातील ती झाडी त्यात भर घालत होती. अचानक महारुद्रास काही अंतरावर झाडीत डोळे चमकताना दिसले. त्याने मोठ्याने कुक देवून पाहिले. ते एका जागी स्थिर झाले. गुरगुर असा आवाज करत पुढे येऊ लागले. महारुद्राने पाठीवरील एक शर काढला व त्या चमकणाऱ्या डोळ्यांमध्ये अचूक नेम धरला. व शर सोडला. तो अचूक त्या प्राण्यास लागला. तो प्राणी इकडे तिकडे पळाला व त्यामुळे झाडीत सरसर ऐकू आली. व थोड्या अंतरावर त्याला त्या औषदाची गुंगी चढली. व तो निपचित खाली पडला. त्याच्या आवाजाने तो एखादा व्याघ्र वा चित्ता असावा. असे महारुद्राने जाणले.

बराच काळ झाडावरील फांद्यांमध्ये बसून महारूद्राला अवघडल्या सारखे झाले. त्याने झाडाचा बुंधा तपासला. त्याला एक कोटी जागा मिळाली. तिथे जाऊन तो बसला. खाली झोप लागल्यावर पडू नये म्हणून त्याने वेलिने घट्ट बांधून घेतले. त्या दुःखदायक प्रसंगाने व माराणे त्याचे अंग दुखत होते. त्यास निद्रा येत होती. पण निद्रा घ्यायला त्याच्या मनाचा विरोध होता.

 कारण त्याची बुद्धी त्यास साथ देत नव्हतो. ती सांगत होती. की झाडाखाली असणाऱ्या पित्याचे त्याने रक्षण करणे ते ही अरण्य श्वापदा पासून हे त्याचे कर्तव्य आहे. रात्र सरता सरत नव्हती. शरीर थकल्याने महारुद्रास निद्रा येऊ लागली . थोडा वेळ त्याचा डोळा लागला. अचानक कोणाच्या तरी गुरगुरण्याचा आवाज त्याला ऐकू येऊ लागला. महारुद्राची निद्रा भंग पावली. त्याने पाहिले. त्याला अंधारात डोळे चमकताना दिसले. आवाजावरून त्याने ओळखले की ती रानटी श्वापदांची टोळी होती. त्यास जाणवले की ती हळूहळू वास घेत तो ज्या झाडावर आहे त्या झाडाकडे ती येत आहेत. तो सावध झाला. त्याने कमरेचा वेलिंचा गुंता काढला. व आपल्या धनुष्यावर पाठीवरील भात्यातील शर काढून त्याने संधान साधण्यासाठी नेम धरला. व शर सोडला. तो शर सर सर आवाज करत निघाला त्याने अचूक वेध घेतला. व तो प्राणी निपचित पडला. त्याचा थोडा आवाज झाला. त्यावरून त्याने ते एक रानकुत्रे होते हे जाणले. व ती रान कुत्र्यांची टोळी आहे ते ओळखले. त्याने एकामागून एक संधान करता चार रानकुत्री वेधली. शरावरील औषधाने ती रान कुत्री बेशुद्ध झाली. आता तो निरखून पाहू लागला. त्याला आता चमकणाऱ्या डोळ्यांची संख्या ही सहा दिसू लागली. व ती मान खाली घालून हुंगत चालली होती. त्याने पाठीवरली भात्यात हात घातला. त्यास फक्त एकच शर हाताला लागला. तो महारुद्राने काढला व चापावर चढवला. व नेम धरला. आता ती रान कुत्र्यांची टोळी सावध झाली होती. ती सावधरित्या पुढे येत होती. त्यांचे संधान करता येईना. त्यातील एक त्या वृक्षाखाली आले. महारुद्र प्रयत्न करू लागला. पण झाडाच्या शाखा आडव्या येत असल्याने त्यास अचूक संधान साधता येईना.

शेवटी त्याने त्या शराने दुसऱ्या कुत्र्यास वेधले. तरी देखील ते कुत्रे पुढे येत होते. आता महारुद्र सरसर खाली आला. व त्याने दनकन त्या कुत्र्याच्या पुढ्यात उडी टाकली. तसे ते कुत्रे गुर गुर करत त्यावर धावून आले. महारुद्राने त्याचा वार चुकवला व ते शर लागलेले कुत्रे काही अंतरावर थोड्या अंतरावर जाऊन पडले. त्यास गुंगी चढली.

दुसऱ्या कुत्र्याने त्याच्या अंगावर उडी मारली. व ते ओरबाडू लागले. व लचके तोडण्याचा प्रयत्न करू लागले. महारुद्राने ते धारदार शस्त्र काढले व त्या कुत्र्यावर चालवले. पाहता पाहता ते रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. व ते बाजूस तळमळत पडले व गतप्राण झाले.

आणखीन एका कुत्र्याने हल्ला केल्यावर महारुद्राने त्याला शेजारी पडलेल्या एका डहाळीचा एक दणका दिला. ते बाजूस पडले. व पळून जाऊ लागले. पण महारुद्राने त्याचे मागील पाय धरून ओढले व त्यास उचलून त्याने जमिनिवर आपटले. तरी ते मारेना. बाह्यमन सांगत होते की त्यास सोडावे. पण अंतरमन त्यास विरुद्ध करत होते. कारण ते जर निसटले. तर आपले आणखीन काही साथीदार घेऊन आले असते. शेवटी त्याने शेजारील फांदीच्या गेचक्यात त्यास घालून त्याने ती पिरंगाळली. ती इतक्या वेगाने पिरंगाळली की त्याचे काही क्षणातच संधान झाले. ते मरण पावले. या सर्व घडामोडीत महारुद्राच्या अंगावर भरपूर जखमा झाल्या. होत्या. तरी देखील त्याने स्वतःस सावरले. आपल्या पित्याच्या त्या निश्चल देहास पुन्हा व्यवस्थित झाकले. अन तो आपल्या पित्याचे संरक्षण करण्यास पहारा देवू लागला.

क्रमशः पुढे.....

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...